दुर्देवी ! मंगळवेढ्यात वीजेचा धक्का लागून २६ वर्षीय वायरमनचा जागीच मृत्यू


मंगळवेढा/प्रतिनिधी:

विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ परिसरात आज रात्री ९.३० च्या सुमारास घडली या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

बिलाल अब्दुलकादर शेख (२६ रा.लवंगी ता.मंगळवेढा) असे त्या मयत वायरमनचे नाव आहे मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, मुरलीधर चौक आदी भागातील विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे दैनंदिन काम सुरु होते.

रात्री ९ वाजेच्या सुमारास ते विजेच्या खांबावर काम करत असताना क्षणार्धात त्यांना काही कळायच्या आत वीजेचा झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहाजवळ आणल्यानंतर गर्दी जमा झाली होती.

Post a Comment

0 Comments