३ वर्षांची असताना शोषणाची बळी ठरल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने केला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.
मी आजपर्यंतच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला आहे. चित्रपट मिळवणंसुद्धा माझ्यासाठी कधीच सोपं नव्हतं, असं फातिमा सना शेखने म्हटलं आहे.
केवळ 3 वर्षांची असताना माझा विनयभंग झाला होता. अशा घटना स्त्रियांच्या आयुष्यात कलंकासारख्या असतात. त्या कधीच या घटनांबद्दल बोलत नाहीत. पण आता जमाना बदलला आहे, असं फातिमाने सांगितलंय.
मलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. आयुष्यात अशीही एक वेळ आली होती, जेव्हा असे सांगण्यात आले की, जर शरीरसंबध ठेवले तरच तेव्हा तुम्हाला नोकरी मिळेल. या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होत असतो, असं फातिमा म्हणालीये.
0 Comments