paytm app गुगल प्ले स्टोअरवरुन हटवलं



नवी दिल्ली ; गुगल प्ले स्टोअर प्लॅटफॉर्मवरुन वरून ऑनलाइन व्यवहारांसाठी लोकप्रिय मोबाईल पेमेंट ॲप 'पेटीएम' हटवण्यात आले आहे. आपण जर हे अँप वापरत  असाल तर ही बातमी आपल्याला त्रास देऊ शकते. कारण लोकप्रिय मोबाइल पेमेंट अॅप Paytm Google Play Store वरून काढून टाकण्यात आले आहे. यानंतर आता युझर्सना हे अॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र Paytm सर्च केल्यानंतर Paytm for business, Paytm money, Paytm Mall हे अद्यापही Play Store वर उपलब्ध आहेत. 

याशिवाय आम्ही अॅपल अॅप स्टोअरवर हे तपासले असता हे अॅप तेथे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आता प्रश्न असा पडतो आहे की युझर्स आता पुन्हा त्याचा वापर करू शकणार नाहीत का?

पेटीएम केवळ Google Play Store वरूनच काढले गेले आहे, मात्र आपण जर आयफोन युझर्स असाल तर हे अॅप अॅपल स्टोअर उपलब्ध आहे. मात्र जर Paytm आपल्या फोनमध्ये आधीपासून अस्तित्वात असेल तर आपण तरीही ते वापरू शकता.

युझर्सला काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. लवकरच या प्लॅटफॉर्मवर परत येऊ, असा विश्वास कारवाई नंतर पेटीएम कडून ट्विटरवरून व्यक्त करण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments