IPL 2020 मधील महागड्या गोलंदाजाचा रोहित शर्मानं केला पालापाचोळा



 गतविजेता मुंबई इंडियन्स ने  च्या सलामीच्या सामन्यातील CSK विरुद्धचा पराभव विसरून आज सांघिक खेळ केला. रोहित शर्माने तर कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना धु धु धुतले. रोहितनं आय पी एल २०२० मध्ये सर्वात महागडा ठरलेल्या गोलंदाजाचाही पालापाचोळा केला. KKRने १५.५  कोटींत आपल्या ताफ्यात घेतलेल्या पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात रोहितनं दोन खणखणीत षटकार खेचले. कमिनन्सने ३ षटकांत ४९ धावा दिल्या.


Kolkata Knight Riders ने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला  प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.  मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक १ धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी ९० धावांची भागीदारी करताना MIच्या डावाला आकार दिला.  सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. रोहितनं ५४ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार खेचून ८० धावा चोपल्या. MIला २० षटकांत ५ बाद १९५ धावा करता आल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या KKR ला मुंबईच्या गोलंदाजांनी इंगा दाखवला. जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी अचूक व भेदक मारा करताना KKRच्या फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. त्याच दडपणात शुबमन गिल आणि सुनील नरीन यांनी विकेट्स फेकल्या. कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांनी KKRच्या डावाला आधार दिला.  मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चतूर माऱ्यासमोर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या बिग हिटर फलंदाजांनाही फटके मारता येत नव्हते. पॅट कमिन्सनं १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चार षटकारांसह २७ धावा कुटल्या. कमिन्स १२ चेंडूंत ४ षटकारांसह ३३ धावा करून माघारी परतला. KKRला २० षटकांत ९ बाद १४६ धावा केल्या. 


Post a Comment

0 Comments