नरेंद मोदीच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न


कोल्हापूर/प्रतिनिधी:

देशाचे कर्तबगार पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमीत्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी लोकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान शिबीरात सहभागी होवुन रक्तदान केले. करवीर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष  विशाल पाटील व भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व सहभागी रक्तदात्यांना वेपोरायजर (वाफेचे) मशिन भेट म्हणून देण्यात आले. 
_________________________________________
📢
पत्ता-: पहिला मजला, शाहूपुरी तिसरी गल्ली, पत्की हॉस्पिटलच्या समोर, कोल्हापूर

(Advertise)
________________________________________

या कार्यक्रमासाठी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकरजी, कोल्हापूर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष पृथ्वीराजजी यादव, करवीर तालुका अध्यक्ष मा. श्री. हंबीरराव पाटील, सोशल मिडीया जिल्हा प्रमुख पृथ्वीराज जाधव तसेच कोल्हापूर जिल्हा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष रणजीत जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments