कोरोनाने घेतला केंद्रीय मंत्र्याचा बळी ; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच काही नामवंत लोकप्रतिनिधी, सिनेकलाकार, उद्योजक यांना देखील कोरोनाच्या विळख्यात जखडले आहे. कोरोनाच्या या महामारीने आज देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले.
गेले दोन आठवडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरेश अंगडी हे पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवित होते. बेळगावमधून ते खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व करीत होते.

Post a Comment

0 Comments