झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध अशा 'अग्गोबाई सासूबाई' मालिकेच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नुकतीच या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या निवेदिता सराफ यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला घरामध्येच अलगिकरण करून घेतले आहे.
या अगोदर 'माझी आई काळूबाई' या मालिकेच्या सेटवर २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातीलच एक जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
एकूणच सेटवरील जेष्ठ आणि वयोवृद्ध कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने ठरवलेल्या धोरणांनावर पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी काही कलाकारांनी या निमित्ताने केली आहे.
0 Comments