दिलासदायक : सोलापूर जिल्ह्यात एकच दिवसात ७७८ कोरोना मुक्त


बार्शी/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यातील ७७८ जण एकाच दिवशी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  महापालिका हद्दीतील ७१ आणि ग्रामीण भागात तब्बल ७०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीतील ६ हजार ८१४ तर ग्रामीण भागातील १६ हजार ८४६ अशा २३ हजार ६६० जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. 
   
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ३१ हजार ८१२ झाली असून त्यामध्ये ग्रामीण भागातील २३ हजार ५६१ तर महापालिका हद्दीतील ८ हजार २५१ जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालानूसार कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील १२ तर महापालिका हद्दीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानूसार ग्रामीण भागात ३१६ तर महापालिका हद्दीत ६६ असे एकूण ३८२ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील १ हजार ११२ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील ६४५ तर महापालिका हद्दीतील ४६७ जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे १०९ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. रुग्णालयात सध्या ७ हजार ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील ६ हजार ७० तर महापालिका हद्दीतील ९७० रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments