देवळाली/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले, यावेळी १११ रक्तदात्यानी रक्तदान केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत अनोख्या रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. प्रत्येक रक्तदात्यांला हेल्मेट व प्रमाणपत्र देण्यात आले, या रक्तदान शिबिराचे संकलन भगवंत रक्तपेढी बार्शी यांनी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे, माजी सभापती शेखर गाडे ,उपसभापती दत्ता सरडे, सरपंच बाळासाहेब शिंदे, उपसरपंच भाऊसाहेब कानगुडे,अण्णासाहेब शिंगाडे, सुधीर आवटे, बंडू शिंदे, नानासाहेब मोरे, सतीश कानगुडे, गोरख पवार, शाहजी कानगुडे, अप्पा गणेशकर, सुनील ढेरे, राजू ढेरे, विठ्ठल गोसावी, संदीप गुंड,सचिन ढेरे, प्रफुल्ल दामोदरे,
गणेश साळवे, राकेश आवटे, तात्या जाधव,तात्यासाहेब जगताप यांच्या सह गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments