"हैड्रोफोनिकस चारा प्रणाली" शेतकऱ्यांसाठी उपयुक्त; वर्षभर मिळणार हिरवा चारा...

"
बारामती; जनावरांच्या संगोपनासाठी तसेच दूधाच्या उत्पादन वाढीसाठी चारा महत्त्वाचा आहे.उन्हाळ्यात चारा सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे व त्यांच्या जनावरांचे खूप हाल होतात. याचा अभ्यास करून कृषी व संलग्न महाविद्यालय येथील चौथ्या वर्षातील कृषी विषयक पदवीचा अभ्यास करणाऱ्या मुलींने  "हैड्रोफोनिकस चारा प्रणाली" या चारा उत्पादन करणाऱ्या प्रणालीचे प्रात्यक्षिक बारामती तालुक्यातील रुई येथील शेतकऱ्यांना करून दाखवले.

त्याचबरोबर हैड्रोफोनिक प्रणाली माझे जनावरांना हिरवा चारा घरच्या घरी पाणी वापरून कसा तयार करता येईल हे सांगितले. हा चारा मातीशिवायतयार केला जातो हे समजावून सांगितले.अंदाजे ३ ते ४ लिटर पाण्यामध्ये एक किलो हिरवा चारा तयार होतो. याकरिता मका,डाळी,हरभरा इ. बियाणे वापरू शकतो. 

अशा पद्धतीने वर्षभर हिरवा चार कसा उपलब्ध करायचा हे प्रात्याक्षिक कृषी महाविद्यालयाच्या कन्या कुमारी स्नेहा कालिदास शिंदे यांनी करून दाखवले व यावेळी गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या. 

Post a Comment

0 Comments