आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस; 'सेवा दिवस' म्हणून होणार साजरा


आज १७ सप्टेंबर रोजी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचा' ७० वा वाढदिवस आहे. मोदींचा वाढदिवस हा भाजपाने  'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी 'सेवा सप्ताह'ची घोषणा केली. 

असा साजरा होणार मोदींचा वाढदिवस

यंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे.रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ७० ठिकाणी ७० कार्यक्रम करण्याचा भाजपाचा विचार आहे. 

मागील एका वर्षामध्ये भाजपा सरकारने काय काम केलं आहे याबद्दलची माहिती पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जनतेपर्यंत पोहचवण्याचा भाजपाचा विचार आहे.अनेक ठिकाणी छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. 
 
कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असं कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आहे.मात्र एकीकडे भाजपाने सेवा सप्ताहची घोषणा केलेली असतानाच दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

Post a Comment

0 Comments