सोलापूर जिल्ह्यातील एसटीची वाहतूक बंद ; पंढरपूर आगारातील १६०० फेर्या रद्द..


पंढरपूर/प्रतिनिधी:

सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात तर रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
   
एसटीने ही सोलापूर जिल्ह्यात प्रवाशी वाहतूक बंद ठेवली आहे. पंढरपूर आगारातून अंर जिल्हा आणि अंतरराज्य  होणार्या १६०० फेर्या आज रद्द केल्या आहेत. शिवाय ग्रामीण भागातील १०० एसटी गाड्या रद्द केल्या आहेत. 
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलिस दलाने जिल्हाभरात कडक पोलिस बंदोबस्त लावला आहे.

Post a Comment

0 Comments