कागल /प्रतिनिधी:
जिल्ह्यासह तालुक्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढणारी संख्या आणि मिळणारे उपचार यापुढे शासकीय यंत्रणाही तोकडी पडत आहे, यावर उपाय म्हणून कागल तालुक्यातील वंदूर ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीतून कोविड काळजी केंद्राची उभारणी केली आहे. कोणताही शासकीय निधी न वापरता लोकवर्गणीतुन गावांने हा ऊपक्रम केला.या केंद्राचे उदघाटन गुरुवारी कागल पंचायत समितीचे सभापती विश्वासराव कुऱ्हाडे यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.अध्यक्षस्थानी सरपंच सारिका प्राण कांबळे होत्या.
कोरोनाने आता ग्रामीण भागातही हातपाय पसरले आहेत. वाढणारी रुग्णांची संख्या यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांची कसरत होत आहे. कोरोना रुग्णांमध्ये अहवाल पॉजेटीव्ह येऊनही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात, अश्या रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी अलगीकरण कक्षात राहणे गैरसोयीचे ठरत आहे, यावर उपाय म्हणून वंदूर ग्रामपंचायत आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येत १० बेडचे सर्वसोयींनीयुक्त कोविड काळजी केंद्र उभारले आहे. या केंद्रात कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेले व अतीसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या निगरानीखाली उपचार घेता येणार आहेत. यासाठी परमपूज्य परामधीकर राजीवजी महाराज आडी, समराजीत घाटगे, दिलीप पाटील, डॉ. विजयसिंह इंगळे, दत्तात्रय कुलकर्णी, धनराज घाटगे, या व्यक्तींनी या केंद्राला मदतीचा हात दिला आहे.
या केंद्रासाठी सरपंच सारिका प्राण कांबळे, उपसरपंच बाळासो पाटील, ग्राम विकास अधिकारी एम. के. कांबळे, नामदेव चौगुले, डॉ. संदीप कांबळे, समशेर शिकलगार, दीपक कांबळे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments