पोलीस भरतीमध्ये १३% जागा मराठा समाजासाठी राखीव ???; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण

राज्यात साडे बारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी १३ टक्के जागा बाजूला काढणार असल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पण ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला योग्य तो न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.


मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. सरकार पुढील दोन दिवसात मराठा आरक्षणाचा मसुदा घटनापीठासमोर सादर करणार आहे.

राज्यात अगोदरच मराठा समाज अरक्षणास स्थगिती मिळाल्याने अस्वस्थ होऊन आंदोलने करीत आहे. यातच राज्य सरकारने मेगा पोलीस भरतीची घोषणा केली. यामुळे मराठा समाजाच्या रागात आणखीन भर पडली आहे. यातूनच मार्ग काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments