धक्कादायक; वृध्द पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; बार्शी तालुक्यातील दुदैवी घटना



पांगरी/प्रतिनिधी : अज्ञात कारणावरून वृद्ध पती - पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे उघडकीस आली.मयत प्रभाकर पंढरी मुळे व त्यांची पत्नी मुक्ताबाई प्रभाकर मुळे या पती - पत्नीने राहत्या घरात साडीच्या बनविलेल्या दाव्याच्या सहाय्याने लोखंडी आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली.

 प्रभाकर पंढरी मुळे (वय ६५) व मुक्ताबाई प्रभाकर मुळे (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे़ याबाबत दिपक बजरंग मुळे (वय ४२ रा. उक्कडगाव) यांनी पांगरी पोलीसात खबर दिली आहे. 

याबाबतची माहिती मिळताच पांगरी पोलिसनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याबाबत पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस कर्मचारी मनोज भोसले हे करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments