जेऊर/प्रतिनिधी;
दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वाशिंबे गावातील कोरोना संशयित ४२ लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली, ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती करमाळा वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे असे आव्हान वाशिंबे ग्रामपंचायत कडून करण्यात येत आहे.
वाशिंबे मधील रुग्णसंख्या ११ वर पोहोचली आहे, या पार्श्वभूमीवर वाशिंबे ग्रामपंचायतीने गावांमध्ये आठ दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. नागरिकाने घाबरून न जाता सोशल डिस्टन्स व मास्क वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments