महिला बचत गटांने वसुली थांबवावी ; महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा



करमाळा / प्रतिनिधी: 
         
महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका च्या वतीने महिला बचत गटाच्या मायक्रोफाइनान्सचे कर्ज वसुली बंद करा व कर्जाचे व्याज माफ करण्यासाठी तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
     
करमाळा तालुका व शहरात सुमारे दोनशे महिला बचत गटांनी मायक्रोफाइनान्स बंधन आयडीएफ सी या सह अनेक फायनान्स मार्फत व्यावसायासाठी कर्ज घेतले होते. सदरच्या घेतलेल्या कर्जातुन महिलांनी लघु उद्योग उभारले .परंतु सध्या देशात कोरोना महामारीने पाच ते सहा महिने महिलांचे उद्योग व्यावसाय बंद असुन त्यांच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे.
    
सध्या परिस्थित त्यांना कुटुंबाची उपजिविका तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच महिला बचत गटाचे नेमलेले प्रतिनिधि व फायनान्स वसुलीदार जबरदस्तीने तगादा लावुन सदर कर्ज घेतल्याचा हप्ता न भरल्यास दोन-तीन पट दुपटीने दंड आकारण्यासाठी धमकी देत आहेत. व तुमच्या सर्व घरगुती सामान आम्ही उचलुन घेऊन जाऊ अशी देखील धमकी देत आहेत जर असे काही घडले तर या बचत गटावर कायदेशीर कारवाई करावी. तरी महिला बचत गटांनी घेतलेली कर्ज त्वरीत माफ करावी असे निवेदनात म्हणटले. 
________________________________________
📢
   
(Advertise)
__________________________________________
यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे तालुका अध्यक्ष संजय घोलप करमाळा शहरअध्यक्ष नानासाहेब मोरे मनसे विद्यार्थी जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतिश फंड जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे तसेच रामभाऊ  जगताप, आशोक गोफणे, रोहित फुटाणे, योगेश काळे, विजय हजारे, जोतिराम आडेकर,व सर्व महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments