सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली तेव्हा शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते, असा सणसणीत टिका माजी मंत्री विनोद तावडे यांनी हाणला आहे.
'मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसात राज्य सरकार १८ हजार पोलीस भरतीचा निर्णय करते. त्यावरूनच सरकारची नियत काय आहे व सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून येतंय,' असा आरोप ही त्यांनी केला.
यावेळी कृषि विधेयकावरून तावडे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'शरद पवार साहेब स्वतः कृषिमंत्री होते. पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण केवळ विरोधासाठी विरोध शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेत्याने करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही,' असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
0 Comments