आयपीएल २०२० ची सुरुवात उद्यापासून होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात युवा खेळाडूंवर सर्वांच्या नजरा आहेत. असाच एक युवा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. राजस्थानचा लोकल बॉय आकाश सिंहला गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात २० लाखांना विकत घेतले.
मुळचा भारतपूरचा असलेला डावखुरा मध्यम वेगवान गोलंदाज आकाश सिंह क्रिकेट खेळण्यासाठी जयपूरकडे वळला. अरावली क्रिकेट अकादमीमध्ये विवेक यादव यांच्या देखरेखीखाली आकाशनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. जवळपास ५ वर्षे या अकादमीमध्ये आकाश क्रिकेट खेळत होता.
0 Comments