सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू



सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी  घडली. शौकतअली मोहिद्दीन शेख (वय ५७) असे मृत्यू नाव आहे. मयत शेख हे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील बिनतारी संदेश विभागात कार्यरत होते. 

 कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत.सो लापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे आणखी एका पोलीसाचा मृत्यू झाला आहे. ते बिनतारी संदेश विभागात कार्यरतद रम्यान याआधी पंढरपूर येथील पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.     

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 'कोरोना'शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना ५० लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.

Post a Comment

0 Comments