मुंबई :खेळाडूंचा अफलातून खेळ आणि तितक्याच रंजक अंदाजात पार पडणारे हे सामने खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांसाठी परवणी ठरत आहेत. चर्चांच्या वर्तुळात असणाऱ्या याच IPL 2020 शी संबंधित आणखी एक विषय अनेकांचं लक्ष आहे. कारण याचा थेट संबंध आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासोबत.
मुंबई विरुद्ध कोलकाता या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा एक व्हिडिओ सचिनची मुलगी सारा हिनं सोशल मिडियावर पोस्ट केला. इन्स्टा स्टोरीमध्ये तिनं हा व्हिडिओ शेअर करत त्यावर हार्ट शेप इमोजी जोडले, सारानं ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर तिच्या आणि शुभमनच्या नावाच्या चर्चांनी जोर धरला.
__________________________________________
📢
__________________________________________
साराची ही एकच पोस्ट चर्चेस वाव देत आहे, असं नाही. यापूर्वीही सोशल मीडियावर या दोघांनी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. निमित्तं होतं एका पोस्ट वरील कॅप्शन. सारा आणि शुभमन या दोघांनीही एकसारखंच कॅप्शन ठेवल्यामुळं नेटकऱ्यांना त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न पडले.
शिवाय शुभमनच्या पोस्टवर सारानं कमेंट करण, त्यावर शुभमननं उत्तर देणं हे सारंकाही बऱ्याच चर्चांना वाव देणारं ठरत आहे. इतकंच नव्हे तर, क्रीडा विश्वात सध्या चर्चेत असणाऱ्या या दोघांमध्ये नेमकं काय सुरु आहे, याला आणखी हवा देऊन जात आहे ती म्हणजे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याची एक कमेंट. सोशल मीडियावर दर दिवशी अनेक विषय चर्चेत येतात, पण त्यातही सचिनच्या मुलीचं नाव एका क्रिकेटपटूशी जोडलं जाणं याबाबत नेटकऱ्यांमध्ये भलतंच कुतूहल पाहायला मिळत आहे हे नाकारता येणार ऩाही.
0 Comments