नोकरीचे अमिष दाखवून विवाहितेसोबत बळजबरीने शरीरसंबंध



मुलाला नोकरी देण्याचे अमिष दाखवून बळजबरीने शारिरिक संबंध केल्याची घटना भिंगार येथे घडली. याबाबतची फिर्याद पिडितेने दिली असून आरोपी शिशिर पाटणकर (पुर्ण नाव माहित नाही, रा.नेवासा, जि. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी, माझे पती आणि मुलगा असे आम्ही तिघे भिंगार येथे राहतो. मी घरकामी करते. शिशिर पाटणकर हा आमच्या गावातच राहणारा असून तो छावणी परिषद अहमदनगर येथे कामाला आहे.


आरोपी पाटणकर याने मी तुमच्या मुलाला कामाला लावून देतो, असे म्हणत मी त्यास ओळखत होते. जुलै २००७ मध्ये आरोपीने ‘मी तुमच्या मुलाला कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे नोकरी लावून देतो’ असे म्हणून मला त्याच्या ऑफिसला बोलावले होते. जुलै २००७ मध्ये पाटणकरने ‘माझे काम नेवासा कोर्टात चालू आहे, तू कोर्टात ये, तेथे आपण बोलू’ असे सांगितले. मी कोर्टासमोर थांबले असता आरोपी पाटणकर तेथे आला व मला म्हणाला की, मी तुझ्या मुलाला नोकरी लावून देतो, मी सांगेल तसे तू वाग. त्यानंतर आपण पाठीमागे जावू असे म्हणाल्याने मी त्याच्यासोबत मागे गेले.
__________________________________________
📢

(Advertise)
__________________________________________

तेव्हा त्याला मी नाही म्हणत असताना आरोपी पाटणकर याने माझ्याशी बळजबरीने शारिरिक संभोग केला. त्यानंतर मुलाला नोकरीस लावून देतो, असे सांगून वारंवार शारिरिक संबंध केले. माझ्या मुलाच्या नोकरीसाठी मी कोणालाही याबाबत काहीही सांगितले नाही. आरोपी पाटणकर यास मी टाळू लागले असता त्याने मला त्रास देण्यास सुुरुवात केली. दि. १४/०९/२०२० रोजी मी बाजारात गेली असता तेथे त्याने मला ‘तू मला भेेटत नाही, तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझी गावभर बदनामी करेल, अशी धमकी दिली.

 

 

Post a Comment

0 Comments