"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार” काँग्रेसचं टीकास्त्र



सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून सरकार आपली हिस्सेदारी विकण्यासंदर्भातील योजना तयार करत आहे. सरकारच्या या धोरणांवरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार, असं म्हणत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर टीका केली आहे.

देशाच्या आणखी २६ सरकारी कंपन्या विकल्या  जाणार आहे. ७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार, असं ट्विट रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.

दरम्यान, मोदीजी काय सांगून सत्तेत आलं होतं ‘मैं देश नही बिकने दूँगा’ त्याचा अर्थ होता देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है तो यही मुमकिन है, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments