✒️सचीन करमाळे
बाजारात ग्राहक राजा आहे. त्याला निवडीचे पूर्ण स्वंतत्र आहे. पण पुढे मोजकेच पर्याय उपलब्ध असतील तर नाईलाज होता.जिओ फुक्कट सीमकार्ड वाटत होते तरीसुद्धा केवळ जाणीवपूर्वक मक्तेदारी ला पाठबळ नको ; म्हणून आयडिया ला सोडलं नाही. आता आयडियाचं नेटवर्क माझ्यापर्यंत पोहचत नाही. मग जड अंतःकरणाने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला.
आजच्या घडीला इंटरनेट हे संवादाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. सुरूवातीला जिओ फोरजी ने हा संवाद स्वस्त केला. जो पर्यंत स्पर्धक हतबल होत नाही, तोपर्यंत हा स्वस्त होता. आपण मात्र संवाद तुटू नये म्हणून दर महिन्याला रिचार्ज करतो. एकदा रिचार्ज केल्यानंतर ती रक्कम अठ्ठावीस दिवसात संपवण्याची अट आहे. शेतकर्यांचं तसं नसतं तो वर्षातून एकदा आपला माल बाजारात घेऊन येतो . अचानक पूरवठा वाढतो आणि मग दर गडगडतात. अशा वेळी सरकारची भूमिका महत्त्वाची असते.
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रातील एकमेव असलेली बी. एस. एन. एल. आता शेवटची घटका मोजतेय. तर एअरटेल व्होडाफोन आणि आयडिया ला मागे टाकून जिओ भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरली आहे. वी वी वी करत व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आलेत. फक्त टूगेदर फाॅर टूमारो साठी. मजी जिओ चं आव्हान एकटं राहून पेलणारे नाही. पुढे स्पर्धेक असे आहेत म्हटल्यावर जिओला मनमानी पद्धतीने दर ठरवणं सोपं झालंय. यामुळेच संवाद महागलाय. पण सुरू रहायला पाहिजे. तूटलेल्या संवादापेक्षा महागलेला संवाद परवडेल.
तरीसुद्धा सुरूवातीला ज्या आयडिया ने साथ दिली त्या आयडियाला पुर्णपणे सोडणं शक्य नाही.म्हणून बेसिक रिचार्ज करून 8975956646 हा नंबर चालू ठेवतोय.यामुळे आयडिया चं नेटवर्क मिळताच लगेच वापरता येईल.तूर्तास जिओ डिजिटल लाईफ चं नेटवर्क वापरून व्यवस्थेला प्रश्न विचारत राहू. आयडिया कॅन चेंज युवर लाईफ, जिओ डिजिटल लाईफ...
संवाद तूटण्यापेक्षा , महागलेला परवडेल!
0 Comments