मराठा आरक्षणावरुन 'या' १४ खासदारांनी दिला संभाजीराजे यांना पाठिंबा!

भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करावं यासाठी समाजातील सर्वच स्तरातून मागणी होत होती.यात आता अनेक लोकप्रतिनिधींची भर पडली आहे. विविध पक्षाच्या १४ खासदार आणि दोन आजी-माजी आमदारांनी संभाजीराजे यांना आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करण्याची गळ घातली आहे. यात भाजपच्याच नव्हे तर शिवसेनेच्या खासदारांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा संभाजीराजे यांना मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करण्यासाठी सर्वाधिक पाठिंबा मिळताना दिसतो आहे. 

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून त्यांना मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्याची गळ घालणाऱ्या १४ खासदार यात शिवसेनेच्या खासदारांचाही समावेश आहे. खासदार श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा, शिवसेनेचे दादरचे खासदार राहुल शेवाळे, प्रतापराव निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, हिना गावित, रक्षा खडसे, प्रितम मुंडे, डॉ. सुजय विखे-पाटील आणि उन्मेष पाटील आदींनी पत्र लिहून आणि प्रत्यक्ष भेटून संभाजीराजे यांना मराठा आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. तर, अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी आमदार निर्मला गावित यांनीही संभाजी राजेंना नेतृत्त्व करण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

Post a Comment

0 Comments