कोल्हापूरात कोरोनाचा उद्रेक ; तब्बल ११९५ नवे रुग्ण, तर २७ जणांचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल ११९५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ५९१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान काल संध्याकाळी ५ वाजल्यापासून आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात तब्बल २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३१३० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज सायंकाळी ९ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ४१८, आजरा तालुक्यातील १३,  भूदरगड तालुक्यातील २९, चंदगड तालुक्यातील १२, गडहिंग्लज तालुक्यातील १७, गगनबावडा तालुक्यातील ४, हातकणंगले तालुक्यातील १४०,  कागल तालुक्यातील ४७,  करवीर तालुक्यातील ११०, पन्हाळा तालुक्यातील २६,  राधानगरी तालुक्यातील १६, शाहूवाडी तालुक्यातील २५, शिरोळ तालुक्यातील ९२,  इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील १७८ आणि इतर जिल्ह्यातील ६८ अशा एकूण ११९५  जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर  ५९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान तब्बल २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५,६१४ एवढी झाली आहे. तर एकूण डिस्चार्ज १६,४२४ देण्यात आले आहेत. ८४०५ उपचारासाठी दाखल रुग्ण आहेत. कोल्हापुरात कोरोना मुळे एकूण मृत्यू ७८५ झाले आहेत.

Post a Comment

0 Comments