मुंबई : मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. दुसरीकडे या निवडणुकीत दुसरे उमेदवार शिक्षक आमदार कपिल पाटील यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा होती, पण भाजपने स्वत:चाच उमेदवार रिंगणात उतरवला. मतविभागणी करत उपसभापती निवडणुकीत विजयासाठी भाजपचा प्रयत्न आहे.
महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होत आहे,भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे.
0 Comments