पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथे कडबा वाहतूक करणाऱ्टेम्पूमधून बेकायदा दारू वाहतुकीवर पंढरपूर तालुका पोलीसांच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये एकूण ४ लाख ६६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोघा जणाना अटक केली आहे.
ही कारवाई बुधवारी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पंढरपूर तालुक्यात दारुमाफियांची गुप्त मार्गाने गोवा बनावटीच्या बेकायदा दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळत होती. दारुमाफ़ियाकडून बेकायदा दारू वाहतुकीसाठी वेगवेगळे मार्ग व विविध युक्त्या वापरल्या जात होते.
माढा तालुक्यातील हिरवे येथून बेकायदा दारू वाहतुक होत असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीसाना मिळाली. पथकाने कडबा घेऊन जाणाऱ्या टेंपोची तपासणी केले असताना त्यात 2 लाख 16 हजार किमतीची गोवा बनावटी मॉकडॉल कंपनीच्या एक हजार ४४० क्वॉर्टर असलेले 30 बॉक्स व अडीच लाख रुपयांची टेंपो (एम.एच. 45, टी 3869 ) आढळून आले.
बेकायदा दारू वाहतुक केल्याप्रकरणी सदानंद दत्तात्रेय यादव ( रा. घोटी ता.माढा), सज्जन आदिनाथ थोरात (रा. हिरवे ता. मोहोळ) याच्यावर कारवाई करण्यात आली. टेंपोसह 4 लाख 66 हजार किमतीचा मुद्देमल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली तर आदिनाथ थोरात, सुधीर शिंदे, सोमनाथ नरले यांच्या पथकाने कारवाई केली.
0 Comments