देवदूतासारखे धावले डॉ.गाॅडद ; दवाखान्याच्या दारात झाली प्रसूती, सामाजिक बांधिलकी ठेवणारे डॉक्टर


याला जबाबदार कोण.? वैद्यकीय व्यवस्था, वैद्यकीय यंत्रणा की समाजव्यवस्था...
           
गडहिंग्लज मध्ये ससेहोलपट झाल्यानंतर सदर महिलेला आजरा येथे डॉ. गाॅडद यांच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. प्रसूतीच्या कळा अनावर झाल्यामुळे त्या महिलेची दवाखान्याच्या दारातच प्रसूती झाली. याप्रकरणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह च्या वादात न पडता प्रसंगावधान दाखवत डॉ.गाॅडद यांनी दारातच आडोसा करून या महिलेची प्रसुती केली. व्यवसाय पलीकडे जाऊन  डॉ.गाॅडद दाम्पत्याने  दाखवलेली सामाजिक बांधिलकी मुळेच महिला व तिच्या बाळा साठी ते  देवदूत बनले. डॉ.गाॅडद त्यांनी  दाखवलेल्या धाडसाबद्दल बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
         
कोरोनाच्या काळात प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये योग्य सल्ला व सेवा देण्यासाठी हेल्थ डेस्कची स्थापना करण्यात आली आहे या हेल्थ डेस्कच्या जबाबदारीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारने गरोदर महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, जी.एस. वाय.योजना याबरोबरच अनेक योजनातून गरोदर महिलांचे प्रसूती पर्यंत काळजी घेतली जाते. असे असतानासुद्धा या महिलेवर असा बाका प्रसंग का यावा याला जबाबदार कोण आरोग्य व्यवस्था, आरोग्य यंत्रणा, समाजव्यवस्था कि आणि कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रसंगामुळे त्या महिलेच्या मनावर झालेला आघात हा कधीही न भरून निघणार आहे. अखेरी गडहिंग्लज मध्ये या महिलेची ससेहोलपट का झाली याला  जबाबदार कोण हा प्रश्न अजून अनुत्तरितच राहत आहे.

Post a Comment

0 Comments