जीवावर उठणारा 'रेमेडिसिव्हर'चा गोरखधंदा- सर्वसामान्य रुग्णांची औषधासाठी फरफट ; सचिन लोंढे पाटील यांचा विशेष लेख

एका मित्राचा काल संध्याकाळी फोन आला. म्हटला वडिलांना रेमेडिसिव्हरचा एक इंजेक्शन द्यायचं आहे. सहा इंजेक्शनचा कोर्समधील पाच इंजेक्शन दिले आहेत. आज एक द्यायचे आहे. संबंध कोल्हापूर फिरत आहे,पण कुठेच इंजेक्शन मिळत नाही. काहीतरी मार्ग निघतो का बघ ??? 
परत तब्बल तासभर फोनाफोनी केली. पण माझ्याही हाती काहीच लागत नव्हत. शेवटी एके ठिकाणी एकच इंजेक्शन शिल्लक होत. नशिबाने ते मिळालं. 

आज सकाळीच दुसऱ्या एका मित्राचा फोन आला. त्यालाही त्याच्या भावासाठी रेमेडिसिव्हरच इंजेक्शन हवं होतं. तो ही रात्रभर संपूर्ण शहरात या औषधासाठी शोधत फिरत होता.पण कुठेच त्याला औषध मिळालं नाही. शेवटी मला फोन झाल्यानंतर मी एक दोन मेडिकल वाल्यांना फोन केला.

प्रसंग पहिला:

मी- रेमेडिसिव्हर इंजेक्शन आहे का ?
मेडिकल- नाही सर. शॉर्टज आहे. सोमवारी उपलब्ध होईल.
मी- काहीतरी जोडणा होते का बघा. पेशंटला खूप गरज आहे.
मेडिकल- सॉरी साहेब, औषधच उपलब्ध नाही.
मी- ओके, उपलब्ध झाल की कळवा.

प्रसंग दुसरा:

मी- रेमेडिसिव्हर इंजेक्शन मिळेल काय ?
मेडिकल- साहेब दोन दिवसानंतर फोन करा. आता काहीच स्टोक शिल्लक नाही.
मी- अर्जंट हवं आहे. पेशंट ऍडमिट आहे.
मेडिकल- औषध आलेलंच नाही साहेब. आम्ही तरी कुठून देणार ?

एकीकडे सर्वसामान्य रुग्ण हॉस्पिटलमध्ये कोव्हीड वरती उपचार घेत आहे तर दुसरीकडे त्यांचे नातेवाईक शहरभर औषधांच्या शोधात फिरत आहेत. काही रुग्ण तर अत्यावश्यक स्थितीमध्ये आहेत. त्यांना हे इंजेक्शन देणं अत्यंतिक गरजेचं आहे. पण इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे नातेवाईकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

* जिल्हा परिषदेची योजना पुन्हा चालू करावी:-

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी जिल्हा परिषदेतर्फे मोफत रेमेडिसिव्हर इंजेक्शन दिले जायचे. ५ हजार रुपयांचे हे इंजेक्शन मोफत मिळत असल्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. पण यातून काही जणांनी आवश्यकता नसली तरीही इथून इंजेक्शन घेतले. त्यामुळे गरजवंत बाजूलाच राहिले. हे लक्षात येताच जिल्हा परिषदेने ही योजना बंद केली. मात्र यामुळे ज्यांना खरीच या औषधांची गरज आहे त्या सर्वसामान्य रुग्णांना मात्र वंचित राहावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने औषध  योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

* बड्या धेंड्यांची मक्तेदारी

कोरोना हा काही माणसाची श्रीमंती- गरिबी पाहून होत नाही.पण उपचार घेण्यामध्ये मात्र उच-नीच चा संदर्भ घ्यावा लागत आहे. काही उच्च वर्गीय लोकांनी गरज नसताना हे औषध उचलले. शरीरात प्रतिकार शक्ती वाढते या गैरसमजुतीमुळे अनेकांनी गरज नसताना हे इंजेक्शन घेतले असल्याचे समोर आले आहे. एकीकडे सर्वसामान्य रुग्ण इंजेक्शन साठी वणवण फिरत असताना काही 'स्पेशल' लोकांमुळे उच्चवर्गीय लोकांना हे औषध सहज उपलब्ध होत आल्याचे देखील समोर येत आहे. 

* प्रशासनाचे प्रत्यक्ष नियंत्रण हवे

रेमेडिसिव्हर इंजेक्शन ची वाढती मागणी पाहता व पुरवठा कमी होत आहे, हे लक्षात घेऊन प्रशासनाने आता कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. साठेबाजी करणाऱ्या नफेखोर लोकांवरती कडक कारवाई करणे आजच्या घडीला आवश्यक आहे. 

Post a Comment

0 Comments