नवीन रेशन दुकानासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत ;पुरवठा आधिकारी


जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

 सोलापूर,दि.१८: जिल्ह्यातील काही भागात नवीन रेशन दुकानाचे परवाने देण्यात येणार असून इच्छुक संस्था, व्यक्ती यांनी ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले आहे.
            
रास्त भाव दुकान, शिधावाटप दुकान परवाना मंजूर करण्यासाठी नवीन दुकानासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत जाहीरनामा काढणे आणि प्रसिद्ध करणे, संस्थां, व्यक्तींचे अर्ज स्वीकारणे ३०ऑक्टोबर, नवीन दुकानासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी, जागेची तपासणी ३० नोव्हेंबर २०२०, नवीन दुकान मूजूर करणे १५ डिसेंबर २०२० असा कालबद्ध कार्यक्रम असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments