पंढरपूर/प्रतिनिधी;
धनगर समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे. तसेच समाजाच्या इतर मागण्या मान्य व्हाव्यात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूरात विठ्ठलांच्या साक्षीने आरक्षण देणार असल्यांचे सांगितले होते. मात्र आता सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन हे समाजाकडून केले जाईल. अशा आशयांचे निवेदन धनगर आरक्षण लढा समन्वय समितीच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले.
पंढरपूरातील धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने येथील तहसिलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा. मागील शासनाने धनगर समाजासाठी जाहीर केलेले १ हजार कोटी रूपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा. शेळी मेंढी महामंडळास ५०० कोटी भांगभाडवल मिळावे. शेळया मेंढयासाठी गायरान जमिनीवर कुरण उपलब्ध करून द्यावे. तसेच मेंढपाळांना संरक्षणासाठी कायदेशीर संरक्षण देण्यात यावे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मुंबईतील चर्चगेट येथे स्मारक उभे करण्यात यावे. अशा मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या. तसेच सदरच्या मागण्यांबाबात सरकारने सकारात्क विचार करावा. अन्यथा राज्यातील धनगर समाज तीव्र आंदोलन करेल. असा इशाराही याप्रसंगी देण्यात आला.
संबधित निवेदन तहसिलदारांना देतेसमयी धनगर समाजाचे समन्वयक सोमनाथ ढोणे , माजी नगरसेवक आदित्य फ्त्तेपूरकर , श्लेषा कारंडे , विजया बावधाने , आरती कोकरे , सुशिल गायकवाड , आणा सलगर , राजू उराडे , संतोष शिरगिरे , बाळासाहेब गडदे , गोविंद मेटकरी , धनाजी बनसोडे, धनंजय पाटील, बिरूदेव वाघमोडे , संतोष ढोणे, दादा कोळेकर , नितीन केसरकर , सचिन चौधरी, आणा सोनलकर, नितीन काळे आदि समाजबांधव याप्रसंगी उपस्थित होते.
0 Comments