बार्शीत कोरोना देवीची प्रतिष्ठापना ; अंधश्रद्धेचा कळस



बार्शी; बार्शीतील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागातील सर्वाधिक मृत्यू हे बार्शी तालुक्यातील आहेत. दुसरीकडे अंधश्रद्धांना पेव फुटलं आहे. त्याचाच भाग म्हणजे बार्शीतल्या पारधी वस्ती येथे चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. 

 एका ठिकाणी अनेक फोटो असलेल्या देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनामुळे कोरोनाआईची स्थापना व पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले असून देवीच्या अशा पद्धतीने सेवा केल्याने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे.

पाराबाई भगवान पवार यांनी आपल्या घरातील देवघरात लिंबू आणि इतर साहित्य ठेवून कोरोना देवीची प्रतिष्ठापणा केली आहे. "देवीच्या कृपेमुळे आम्हाला सर्दी, खोकला किंवा कसला त्रास नाहीये. इथे आम्ही कोरोनादेवीची स्थापना केली असून देवीमुळे आमच्या केसालाही धक्का लागत नाही, ज्याचा त्याचा मान दिला तर काही होत नाही. 

Post a Comment

0 Comments