माढा/प्रतिनिधी;
केंद्र सरकारने १४ सप्टेंबर, २०२० रोजी कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला, हा निर्णय जाहीर करून रकारने शेतकर्यांची घोर निराशा केली. या निर्णयाचा फेरविचार करून सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी माढा तालुका तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या कांद्याला दोन पैसे जास्त मिळाले की लगेच निर्यातबंदी करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आशा निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष अमित चोपडे, तालुकाध्यक्ष जमीर शेख उपस्थित होते.
0 Comments