भाजपा नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
मुंबई – कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, असा आरोप राज्यातील विरोधीपक्षांकडून केला जातोय. कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट बनत आहे, त्यामध्ये हि राजकारण सुरु झालं आहे, विरोधकांच्या या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत सारखीच असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. भातखळकरांनी याबाबत ट्विट करताना, “कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजीना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा” असा चिमटा त्यांनी काढला आहे.
“उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत. ज्या प्रकारे प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती.
0 Comments