पंढरपूर/प्रतिनिधी;
सोलापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शनिवारी पहाटे कोसळत होता. एक सारखा पडणारा पाऊस पाहणाऱ्यांनाही भीतीदायक ठरत होता. शहरातील सखल भागात असलेल्या काही घरात पाणी शिरले होते. पंढरपूर ते सातारा, पुणे ते पंढरपूर हा मार्ग वाहतुकी साठी बंद झाला होता. त्यामुळे वाहनाच्या रांगचरांगा लागल्या आहेत. अनेक भागांतील ओढे व नाल्यांना पूर आला होता.
दरम्यान,पंढरपूर तालुक्यातील भेंडी शेगाव, खडी तर माळशिरस तालुक्यातील बोंडले-बोडले गावात ओढ्याला आलेल्या रस्ते आणि काही घरांची पडझड झाली आहे. ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. डालिंब, ऊस, द्राक्षी, ज्वारी, कांदा, पिकाचे नुकसान झाले. पिकामध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे पिके वाहून गेली आहे. पावसामुळे नदीकाठी तसेच सखल भागातील खरिपाच्या बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे सांगोल्यातील महूद येथील कासाळ ओढा भरुन वाहू लागला. पंढरपुरातील भेंडी शेगाव, खर्डी येथेही अनेक भागात ताली भरल्या. जवळच्या नाल्यातही बरेच पाणी साठले. काही भागात बहुतांश छोटे-मोठे पाझर तलाव निम्मे, तर काही भरले.
पंढरपूर, माळशिरस, सांगोला तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पडला आहे. या तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद देखील करण्यात आली आहे.
करकंब ९ मिमी, पट कुरोली ४९ मिमी, भंडीशेगाव ९ मिमी,
भाळवणी ६२ मिमी, कासेगाव १२ मिमी, पंढरपूर ७ मिमी, तुंगत १ मिमी, चळे १४ मिमी, पुळुज ९ मिमी
एकूण पाऊस १७२ मिमी नोंद तर सरासरी पाऊस १९.११ मि.मी. पावासाची पडला आहे.
0 Comments