२०२०-२०२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू अर्ज करण्याची प्रकिया सुरु



 ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे जसे  रोटावेटर,  पेरणी यंत्र,  मळणी यंत्र , नांगर, कापणी यंत्र , फवारणी यंत्र ,खरेदी करायचे असतील अशा शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टल वर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. 

ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे यापूर्वी अर्ज केले आहेत ते सर्व अर्ज रद्द करण्यात आलेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी नव्याने ऑनलाइन पोर्टल वर अर्ज करावे.

लाभार्थी निवड लकी ड्रॉ /सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्ज भरल्याची पावती जपून ठेवावी.                

Post a Comment

0 Comments