मराठा आरक्षण स्थगिती; करमाळ्यात कडकडीत बंद



करमाळा/प्रतिनिधी;

२१ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाने सोलापूर बंदची हाक दिली होती, याच पार्श्वभूमीवर संपूर्ण करमाळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाकारल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते.
या आव्हानाला करमाळ्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता,शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सर्व मराठा बांधव एकवटले होते, यावेळेस आरक्षणासंबंधी चे निवेदन करमाळा तहसीलदार समीर माने व करमाळा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकवटलेल्या मराठा समाज बांधवांनी दिलेल्या घोषणांनी छत्रपती चौक दणाणून निघाला.

Post a Comment

0 Comments