अजब प्रेम की गजब कहाणी! पहिल्याच भेटीत लग्न, मध्य प्रदेशची लेक झाली वर्ध्याची सून....



वर्धा : प्रेमाला कोणतीच सीमा नसते प्रेम आंधळं असतं, असं म्हटलं जातं. वर्ध्यात जे घडलं ते ऐकून पाहून तुम्हालाही कदाचित असंच वाटेल. मध्य प्रदेशमधील मुलीची आणि महाराष्ट्रातील मुलाची सोशल मीडियावर मैत्री झाली, मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं आणि पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत दोघे लग्नगाठीत अडकले. वर्ध्यात त्यांनी झालेल्या प्रेमाचं रुपांतर सहजीवनाची गाठ बांधण्यात झालं.

आजकाल अनेकांना सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्याचा छंद असतो. आर्वीतील एका युवकाने टिक-टॉकवर व्हिडिओ बनवले. व्हिडीओ मध्यप्रदेशातील एका युवतीला आवडू लागले. तिने त्याचे टिकटॉक अकाउंट फालो करायला सुरुवात केली. काही महिने टिकटॉकवरच हाय हॅलो झालं आणि प्रेम खुलू लागलं. त्यांचे व्हिडिओ पाहून मध्य प्रदेशात राहणारी युवती त्याच्या प्रेमात पडली.

या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीतूनच तीन त्याला प्रपोज केलं आणि त्यानंही होकार दिला.. कधीही एकमेकांना प्रत्यक्ष न भेटलेलं हे युगुल एकमेकांत पुरत गुरफटलं. कुणीही एकही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नाही. मात्र, याचवेळी एक दुःखद प्रसंग युवतीवर ओढवला. कर्करोगासारख्या आजाराने तिला ग्रासलं. मात्र, या कठीण प्रसंगात युवकाने तिची साथ सोडली नाही. त्याच्या साथीने तिने कर्करोगावर मात केली आणि त्यांच्या प्रेमाचा विजय झाला. आजारातून बरे झाल्यानंतर तिने घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याला भेटण्यासाठी राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रातील वर्ध्याच्या आर्वीत पोहोचली.

Post a Comment

0 Comments