राजेंद्र मिरगणे यांचे गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष पद गेले


बार्शी/प्रतिनिधी;  भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्याकडील गृहनिर्माण विकास महामंडळाचे सह अध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला होता.


राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात बार्शीपुत्र राजेंद्र मिरगणे यांची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर, या महामंडळाचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर, या महामंडळावरील नियुक्या रद्द करण्याबाबत सातत्याने विचार सुरू होता. अखेर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यानंतर आज शासनाने अध्यादेश काढून राजेंद्र मिरगणे यांचे पद काढून घेतले आहे. हा अद्यादेश राज्यपालांच्या सल्ल्यानुसार उपसचिव रामचंद्र धनवडे यांनी काढला आहे.

बार्शीकरांना हा एकप्रकारे धक्काच आहे. बार्शीचा हक्काचा माणूस राज्याच्या गृहनिर्माण विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवत होता. मात्र, सरकार बदलल्यानंतर आता या पदावरील व्यक्तीही बदलणार असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत पद टिकवण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


Post a Comment

0 Comments