कोरोनामुळे कळे येथील एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यु; कळे परिसरात हळहळ



कळे/प्रतिनिधी:

कळे येथील देसाई कुटूंबातील दोन भावांसहित त्यांच्या आईचा कोरोना सदृश्य आजारामुळे मृत्यु झाला आहे. यामुळे देसाई कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दीपक पांडूरंग देसाई, सागर पांडूरंग देसाई, मालूबाई पांडूरंग देसाई असे मृत पावलेल्यांचे नाव आहे. तसेच एक भाऊ आणि वडील ही गंभीर असल्याची माहिती आहे.

 आज पहाटे उपचार सुरू असताना मालुबाई देसाई व मुलगा दीपक देसाई यांचे निधन झाले तर दुपारी एकच्या सुमारास सागर देसाई यांचे निधन झाले असून जलाराम देसाई व वडील पांडुरंग देसाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत असून लोकांच्या मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकिय उपचार घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments