बार्शी/प्रतिनिधी;
गेल्या सहा महिन्यांपासून देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत, त्याच्या परिणाम छोट्या मोठ्या प्रमाणात सर्वच घटकांवर होताना दिसत आहे.
गुरव समाजाची रोजीरोटी पूर्णतः मंदिरावर अवलंबून असते, सध्या मंदिर बंद असल्याने पुजाऱ्यावर उपासमारीची स्थिती आली आहे, त्यामुळे मंदिरे लवकरात लवकर खुली करावीत यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांना अखिल भारतीय गुरव संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी अखिल गुरव समाजाचे कार्यकारी अध्यक्ष अभिजीत क्षीरसागर,उपळाई (ठों)चे नेते बाबासाहेब तोरणे,समर्थ गुरव, अनिकेत जगदाळे, ज्ञानेश्वर मस्के, अभिजीत भोसले, पंकज भदे यांच्या सह नागरिक उपस्थित होते.
0 Comments