विश्वमराठासंघ धाराशिव यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन



भूम/प्रतिनिधी:

मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने पावसाळी अधिवेशनात मराठा समाजासाठी आरक्षण जी काय तरतूद आहे ती करावी. मराठा आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सेवा व सवलती उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी विश्व मराठा संघ धाराशिव यांच्यावतीने आज उपजिल्हाधिकारी असं निवेदन देण्यात आले.

मराठा समाजासाठी शैक्षणिक सवलत, सारथी साठी १००० कोटींचा निधी,बेरोजगार भत्ता यासह मराठा समाजासाठी कल्याणकारी योजना यासारख्या अनेक मागण्या ह्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. मा.मनिषा राशिनकर ( उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ) उपविभाग भूम यांनानिवेदन देण्यात आले. 

यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हाध्यक्ष, अजित तांबे युवक जिल्हाध्यक्ष, उमेश जाधव युवक जिल्हाकार्याध्यक्ष, ऍड. योगेश पाटील जिल्हा कायदेशीर सल्लागार 
व युवक तालुका कार्येअध्यक्ष भूम कृष्णा घिमरुड उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments