"बॉलिवूड मधील झाशीची राणी एवढी का शेफरली?"



मुंबई : कृषी विषयक विधेयकांवरून राज्यसभेत खूप गोंधळ झाला. कृषी विषयीच्या विधेयकांना विरोध करणाऱ्यांचा अभिनेत्री कंगणा राणावतने दहशतवादी म्हणून उल्लेख केला. यानंतर कंगणाने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.

कंगणाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगणा शेतकऱ्यांना दहशवादी म्हणाली असून तिने शेतकऱ्यांची माफी मागावी असं म्हटलं. मात्र याला उत्तर देत ‘शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं असल्याचं सिद्ध केल्यास माफी मागून ट्विटर कायमचं सोडून देईन’ असं सांगितलंय.

कंगणा तिच्या ट्विटमध्ये म्हणते, ‘ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची नारायणी सेना होती, “त्याचप्रमाणे पप्पूची एक चंपू सेना आहे. ही जी फक्त अफवांच्या आधारे लढते. जर माझ्या मुख्य ट्विटमध्ये मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं असल्याचं कोणी सिद्ध केलं तर माफी मागून कायमचं ट्विटर सोडून देईन.”

Post a Comment

0 Comments