भाजपच्या 'या' नेत्यांची नार्को टेस्ट करा: सचिन सावंत

राज्यात कंगणावरून राजकीय वातावरण पेटताना दिसत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी अभिनेत्री कंगणा राणावतला पाठींबा दिला होता.मात्र आता याच भूमिकेवरून राज्यातील इतर पक्ष आणि मान्यवर मंडळी टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. यावरून काँग्रेसने राम कदम यांना घेरलं आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कदमांवर निशाणा साधत भाजपरवही टीकास्त्र सोडलं आहे.


विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूडचे संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजप कार्यालयात 53 वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता आणि भाजपचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments