कंगना राणावत गजाआड जाणार?


अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चांगलीच चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनानं बॉलिवूड मधील नेपोटीजम, मुव्ही माफिया यांच्यासह काही राजकीय नेत्यांवरही टीका करत वादग्रस्त विधानं केली आहेत. यामुळे अनेकांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. मात्र, आता कंगनानं कृषी विधेयकासंबंधित केलेल्या एका ट्विटमुळं शेतकऱ्यांनी थेट कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
__________________________________________
📢
(Advertise)
_________________________________________

केंद्र सरकारनं नुकतीच तीन कृषी विधेयकं सादर केली आहेत. केंद्र सरकारनं सादर केलेली विधेयक शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहेत, असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे देशातील अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर कंगनानं एक ट्विट केलं होतं. हे ट्विट शेतकऱ्यांचं अपमान करणारं आहे, असं म्हणत कंगना राणावत विरुद्ध कर्नाटकच्या तुमकुरच्या एका न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत गजाआड जाणार?




Post a Comment

0 Comments