मुंबई येथील इंदूमिल या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होती. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही, देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे, असं मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडलंय.
मात्र, आपल्याला आता आमंत्रण आलं तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा, असं स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलंय. दुसरीकडे निमंत्रण न मिळालेले खासदार रामदासजी आठवले नाराज आहेत.
0 Comments