पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं करोनामुळं बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झालं, ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मागील आठवड्यात त्यांना करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची करोना चाचणी केल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना सीईओपी मैदानावरील कोविड केअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इथे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज पहाटेच्या सुमारास उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असून मागील दहा वर्षांपासून ते पत्रकारिता करतात, त्यांनी मुंबई, नगर, पुणे जिल्ह्यात विविध वृत्तवाहिन्या मध्ये काम केले.
0 Comments