उमेदचा कारभार कंत्राटदाराकडे देण्याचा घाट-अर्चनाताई पाटील यांचा आरोप


उस्मानाबाद - गेल्या ९ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मार्फत ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाद्वारे जोडून त्यांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे कार्य यशस्वीरीत्या सुरू आहे. परंतु, नुकतेच या उमेदच्या राज्य सीइओंनी एक पत्र काढून यामध्ये काम करणाऱ्या ज्या समन्वयकांचा कार्यकाल संपला आहे त्यांना पुनर्नियुक्त्या न देण्याचे सांगितले आहे. 

अशा प्रकारे हे अभियान खासगी कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा राज्य शासनाचा डाव असून यातून महिलांऐवजी कंत्राटदारांचे सबलीकरण होणार असल्याने याला विरोध म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचा दागिना पाठवून हा निर्णय बदलण्याचे आवाहन करणार असल्याची माहिती जिपच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments