जिनिव्हा : जगभरात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात हि कोरोनाने थैमान घातले आहे त्याचा मोठा फटका बसला आहे. जगभरातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला.
यास्तव अनेक देशांनी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला. पण, यावर जागतिक आरोग्य संघटनेने आवाहन लॉकडाऊन पूर्णपणे हटवू नका असे आवाहन केले आहे. कोणत्याही देशाने कोरोना संपुष्टात आला आहे अशा पद्धतीने वागू नये असेही डब्ल्यूएचओनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम गेब्रेयेसस यांनी केले.
ट्रेडोस म्हणाले, जगभरातील विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये, कामकरी वर्गाला आपल्या कार्यालयांमध्ये पुन्हा जाताना पाहायचे आहे. परंतु, ही महामारी पूर्णपणे संपली आहे, अशाप्रकारे कोणत्याही देशाने वागू नये. जर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कोणता देश प्रयत्न करत असेल तर त्यांना प्रथम कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवायला हवे. तसेच लोकांचे प्राणही वाचवायला हवे. कोणत्याही नियंत्रणाशिवाय निर्बंध उठवणे म्हणजे विध्वंसाला आमंत्रण देण्यासारखे आहे.
0 Comments